Thursday, May 23, 2024

भ्रष्टाचाराच्या व्याख्या ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भ्रष्टाचाराच्या व्याख्या

एखाद्याचे हात ओले केले की,
त्याला खर्चा पाणी म्हटले जाते.
भ्रष्टाचाराचे प्रकरण असे,
टेबलाखालीच मिटले जाते.

काय खाल्ले ? किती खाल्ले ?
याच्यावरती किंमत बेतली जाते.
शेकड्यातला व्यवहार रोकड्यात,
म्हणजे चिरीमिरी घेतली जाते.

लाखात आणि कोटीत घेतले की,
करप्शन म्हणायला हरकत नाही !
काडीने खाल्ला किंवा बचकीने,
लाचेच्या पैशाला बरकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8570
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 99 वा

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 99 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ud9ziVPHpKdC6VtEsC9M...