Friday, May 17, 2024

राजकीय दरवाजे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय दरवाजे

तुम्ही आम्ही सगळे येडपट,
आपले स्क्रूच जरा ढिले असतात.
राजकारणाचे दरवाजे तर,
सगळ्यांसाठीच खुले असतात.

चुकून दरवाजे बंद केले तरी,
शिल्लक ठेवलेली फट असते.
राजकारण करा आणि करू द्या,
फक्त एवढीच त्यांची अट असते.

उघड्या ठेवलेल्या दरवाजातून,
कुणीही येऊ आणि जाऊ शकतात !
आपण कितीही शॉकप्रूफ असलो तरी,
ते आपल्याला धक्के देऊ शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8564
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17मे2024
 

No comments:

DAILY VATRATIKA...15MARCH2025