Wednesday, May 1, 2024

उमेदवारीच्या खेळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीच्या खेळ्या

कुणी उभे केलेले आहेत,
कुणी उभे राहिले आहेत.
कुणी हौसोबा-नवसोबा,
कुणी नहिले पे दहीले आहेत.

जशी डमीची कमी नाही,
तशी जिंकण्याचीही हमी नाही.
उमेदवारांची खोगीरभरती,
त्यामुळेच तर कुठेच कमी नाही.

जातीपाती आणि नातीगोती,
सगळेच फंडे खेळ्यात आहेत !
प्रत्यक्ष उमेदवारांबरोबरच,
मतदारही बुचकळ्यात आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8550
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1मे2024
 

No comments:

DAILY VATRATIKA..14MARCH2025