आजची वात्रटिका
--------------------------
ईव्हीएमची बदनामी
आज अळीमिळी गुपचिळी,
त्यांचे गुपित आम्ही खोलत नाहीत.
काल ईव्हीएम विरोधात बोलणारे,
आज मात्र विरोधात बोलत नाहीत.
ईव्हीएम आहे तसेच आहे,
कुणाकुणाचा लंगडा विरोध आहे.
ईव्हीएम हॅक होऊ शकते,
हा सरळ सरळ जावईशोध आहे.
पुराव्याशिवाय बोलणे,
हा प्रकार तर खुले आम आहे !
नाचता येईना अंगण वाकडे,
हकनाक ईव्हीएम बदनाम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8558
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10मे2024
No comments:
Post a Comment