Thursday, February 29, 2024

दैनिक वात्रटिका29फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -267वा


दैनिक वात्रटिका
29फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -267वा 
पाने -30
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

गॅरंटीची भाषा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गॅरंटीची भाषा

आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर,
आता तर गॅरंटीची भाषा आहे.
आपल्याच वरातीला,
आपलाच बेंडबाजा अन ताशा आहे.

जसे हाकारेही आपलेच आहेत,
तसे पुकारेही आपलेच आहेत.
आता गॅरंटी वॉरंटीही खपेल,
यापूर्वी हे फंडे खपलेच आहेत.

बदलत्या आणि नव्या काळाच्या
बदलत्या प्रचार भाषा आहेत !
बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये,
दुसऱ्या कोणत्या आशा आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8490
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29फेब्रुवारी 2024
 

Wednesday, February 28, 2024

दैनिक वात्रटिका28फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -266वा

दैनिक वात्रटिका
28फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -266वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

मास्टर माईंड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मास्टर माईंड

जे बनतात हातचे बाहुले,
ते मेंदूने ब्लाइंड असतात.
कर्ते वेगळे दिसले तरी,
मागे मास्टर माईंड असतात.

मास्टर माईंडच्या हाती,
बाहुल्यांची चावी असते.
बाहुल्यांनासुद्धा ही गोष्ट,
अगदी पक्की ठावी असते.

आपल्या हातच्या बाहुल्यांना,
वापरले आणि ढोपरले जाते !
एका बाहुल्याचा बळी गेला की,
दुसरे बाहुले वापरले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8489
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28फेब्रुवारी 2024
 

Tuesday, February 27, 2024

दैनिक वात्रटिका27फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -264वा

दैनिक वात्रटिका
26फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -264वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

मराठी भाषा समृद्धी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मराठी भाषा समृद्धी

आजकाल राजकारण्यांमुळे तरी,
मराठी भाषा समृद्ध होऊ लागली.
मराठी भाषेची प्रत्येक बोली,
आजकाल ऐकायला येऊ लागली.

दर दहा कोसाला जशी भाषा बदलते,
तशी नेत्याप्रमाणेभाषा बदलू लागली.
जो लावतो जसा ताव,
तशी भाषेचीही नशा बदलू लागली.

जसे काय राजकीय नेत्यांकडे,
मराठी भाषा समृद्धीचे गुत्ते आहे !
साहित्य संमेलनातून मिरवल्याने,
त्यांचे काम शंभर टक्के फत्ते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8488
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27फेब्रुवारी 2024
 

Monday, February 26, 2024

दैनिक वात्रटिका26फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -264वा

दैनिक वात्रटिका
26फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -264वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1lQzj08zJFnRSnelxXg8gYlORpTAOJHWU/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

धोक्याचे वळण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

धोक्याचे वळण

आरोपावर प्रतिआरोप आहेत,
बढाया वर बढाया आहेत.
कालच्या सामाजिक लढाया,
आज वैयक्तिक लढाया आहेत.

समाजकारणात राजकारण,
त्यामुळेच सगळा पचका आहे.
जुळत आलेल्या गोष्टींचा,
अचानकपणे विचका आहे.

संयम आणि अतिरेक,
यांच्याही मर्यादा पार आहेत !
अगदी छातीठोकपणे,
आता कमरेखाली वार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8487
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26फेब्रुवारी 2024
 

Sunday, February 25, 2024

दैनिक वात्रटिका25फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -2623वा


 दैनिक वात्रटिका
25फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -2623वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

कॉपीचा रोग..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कॉपीचा रोग

देवी गेला;पोलिओ गेला,
कॉपी जायची शक्यता नाही.
कॉपीचा कायमचा बंदोबस्त,
काही व्हायची शक्यता नाही.

केजी पासून पीजी पर्यंत,
मागे कॉपीचे भूत आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये तर,
कॉपीला एकच उत आहे

त्याला पेपर कसे म्हणावे?
जो परीकक्षेपूर्वी फुटत नाही!
कॉपीशिवाय परीक्षासुद्धा,
परीक्षा काही वाटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8486
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25फेब्रुवारी 2024
 

Saturday, February 24, 2024

दैनिक वात्रटिका24फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -262 वा


दैनिक वात्रटिका
24फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -262 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

राजकीय समीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय समीकरण

बेरजेच्या राजकारणात,
निष्ठेची वजाबाकी होऊ लागली.
कुठून कुठून नेते मंडळी,
एकाच पक्षात जाऊ लागली.

सत्तेच्या गुणाकारात,
तत्वांचा भागाकार होत आहे.
हातचे बरोबर मोजले तरी,
चुकीचीच बेरीज होत आहे.

पक्षीय समतोल साधला तरी,
समीकरण काही सिद्ध होत नाही !
एकाच दर्शनाने काही,
कोणताच देव वृद्ध होत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8485
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24फेब्रुवारी 2024
 

Friday, February 23, 2024

दैनिक वात्रटिका23फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -261 वा


दैनिक वात्रटिका
23फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -261 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

सुप्त इरादे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सुप्त इरादे

सर्व काही मिळूनसुद्धा,
राजकारणी अतृप्त असतात.
वरवर वेगळे दिसले तरी,
त्यांचे इरादे मात्र सुप्त असतात.

कावळा बसला फांदी मोडली,
असे कधीच काही होत नाही !
राजकीय बंडाळीला,
उधाण काही उगीच येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8484
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23फेब्रुवारी 2024
 

Thursday, February 22, 2024

दैनिक वात्रटिका22फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -260 वा


दैनिक वात्रटिका
22फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -260 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

काळाची कसोटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काळाची कसोटी

कोण खरे? कोण खोटे?
कोण तकलादू? कोण बेगडे आहे?
काळाच्या कसोटी वरती,
सगळेच कसे उघडे नागडे आहे.

अगदी सगळ्यांना फसवता येते,
पण काळाला फसवता येत नाही.
कुणालाही गप्प बसू शकतात,
काळाला गप्प बसवता येत नाही.

काळ एवढा निष्ठुर की,
दुधाचे दूध पाण्याचे पाणी करतो !
ज्यांना तुम्ही दूधखुळे समजता,
त्यांना सुद्धा काळ ज्ञानी करतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8483
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22फेब्रुवारी 2024
 

Wednesday, February 21, 2024

दैनिक वात्रटिका21फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -259 वा

दैनिक वात्रटिका
21फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -259 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

Tuesday, February 20, 2024

दैनिक वात्रटिका 20फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -258 वा


दैनिक वात्रटिका
20फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -258 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

सक्ती,भक्ती आणि मुक्ती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
सक्ती,भक्ती आणि मुक्ती
नेत्यांच्या पक्षांतराच्या,
बातम्यांबरोबर वावड्या आहेत.
त्याचेच चांगभले आहे...
ज्यांच्याकडे गुळ खोबरे,
ज्यांच्याकडे रेवड्या आहेत.
अफवा आणि वावड्या,
जरा जास्तच खऱ्या होत आहेत.
कुणावर सक्ती होत असली तरी,
त्यांच्या इच्छा पुऱ्या होत आहेत.
सक्तीपोटी भक्ती आहे,
भक्तीसाठी राजकी युक्ती आहे !
शेवटचे दिवस तरी गोड जावेत,
यासाठी संकटातून मुक्ती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8481
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20फेब्रुवारी 2024

 

Monday, February 19, 2024

दैनिक वात्रटिका19फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -257 वा

दैनिक वात्रटिका
19फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -257 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

गुंडांचे मनसुबे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
गुंडांचे मनसुबे
राजकीय पक्षात जाण्यापेक्षा,
आपण आपलाच पक्ष काढू.
उघड उघड आपण लढतोच,
नंतर लपून-छपून ल लढू.
ते आपल्यामुळे जिंकतात,
आपण सहज जिंकू शकतो.
आपल्या उपद्रवमूल्यावरती,
कशाला कोण शंकू शकतो ?
इतरांप्रमाणे आपल्यावरही,
लोकशाही कशी हसेल?
बंदूक, सुरा किंवा हातकडी,
हाच आपलं सिम्बॉल असेल !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8480
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19फेब्रुवारी 2024

 

पक्षीय कलम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पक्षीय कलम

कधी याला; कधी त्याला,
जाळ्यामध्ये घेरू लागले.
एका पक्षावर दुसऱ्या पक्षाचे,
राजकीय कलम करू लागले.

काही जाळे गोडी गुलाबीचे,
काही जाळे जुलमी आहेत.
काही राजकीय पक्ष तर,
एक नाही अनेक कलमी आहेत.

राजकीय कलम केलेले पक्ष,
बहुरंगी बहुढंगी वाटू लागले !
दररोज कोणत्या तरी पक्षाला,
नव नवीन कलम फुटू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8479
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18फेब्रुवारी 2024
 

Sunday, February 18, 2024

दैनिक वात्रटिका18फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -255वा

दैनिक वात्रटिका
18फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -255वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

Saturday, February 17, 2024

दैनिक वात्रटिका17फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -254वा पाने - 45


दैनिक वात्रटिका
17फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -254वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

आभाळाएवढे समाधान...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आभाळाएवढे समाधान

सारी दुनियाच भ्रष्ट आहे,
असे म्हणणे नकारात्मक वाटते.
भ्रष्टाचाराला व्यवहार म्हणा,
असे म्हणणे सकारात्मक वाटते.

प्रश्न मग एवढाच उरतो,
तुम्ही देणारे की घेणारे आहात?
जसे वारे तसे उफणावे,
असे शरणागत होणारे आहात ?

आकाशाला ठिगळ लावताना,
लावणाऱ्याचीही फाटू शकते !
ठिगळ लावायचा प्रयत्न केला,
हे लढाऊ समाधान मिळू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8478
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17फेब्रुवारी 2024
 

Friday, February 16, 2024

दैनिक वात्रटिका16फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -254वा पाने -45


दैनिक वात्रटिका
16फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -254वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

निष्ठावंत हटाव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निष्ठावंत हटाव

निष्ठावंत कार्यकर्त्यांची,
झिजून झिजून हयात गेली.
त्यांच्याच नाकावर टिच्चून,
नेतेमंडळी आयात केली.

आयातीच्या मालाला,
नको तेवढा उठाव आहे.
राजकीय व्यवहाराचे नाव,
निष्ठावंत हटाव आहे.

लाज,लज्जा,शरम,अब्रू,
असले काही कुणाला आहे?
आज निष्ठावांतांची निष्ठा,
सगळीकडेच पणाला आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8477
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16फेब्रुवारी 2024
 

Thursday, February 15, 2024

दैनिक वात्रटिका15फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -253वा


दैनिक वात्रटिका
15फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -253वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

पॉलिटिकल मॅजिक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पॉलिटिकल मॅजिक

कालच्या घोटाळे बहाद्दरांना,
एका फटक्यात क्लीन चीट आहे.
घोटाळे बहाद्दरांइतकाच,
त्यांना क्लीन देणाऱ्यांचा वीट आहे.

काल ज्यांनी काढले धिंडवडे,
आज त्यांच्याच तोंडी आरती आहे.
काल ज्यांची निंदा नालस्ती होती,
त्यांचीच आज मोठी कीर्ती आहे.

काल गळे काढणाऱ्यांचेच,
आज गळ्यामध्ये गळे आहेत !
त्यांनी केलेल्या पापांची,
जनतेच्या पदरात फळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8476
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15फेब्रुवारी 2024
 

Wednesday, February 14, 2024

दैनिक वात्रटिका14फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -252वा


 दैनिक वात्रटिका
14फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -252वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

Tuesday, February 13, 2024

दैनिक वात्रटिका13फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -251वा पाने -45


 दैनिक वात्रटिका
13फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -251वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

' हात ' तिच्या आयला !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

' हात ' तिच्या आयला !

चौकशी यंत्रणांच्या दबावापुढे,
भल्या भल्यांची निष्ठा ढळती आहे.
सत्तेच्या राजकीय उन्हाळ्यात,
अखेर 'अशोका'ला सुद्धा गळती आहे.

अशोक पर्वाच्या इतिहासाला,
पेड न्यूजचा काळा डाग आहे.
आदर्श घोटाळ्याच्या भुताचा,
चोख बंदोबस्त करणे भाग आहे.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय काही,
अजिबात 'हात' घाईचा वाटत नाही !
कुठलेच कारण नसल्याचे,
प्रतिपादन अजिबातच पटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8475
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13फेब्रुवारी 2024
 

Monday, February 12, 2024

दैनिक वात्रटिका12फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -250 वा


दैनिक वात्रटिका
12फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -250 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

फोटोतली गुंडागर्दी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फोटोतली गुंडागर्दी

यांच्या फोटोत गुंड दिसतात,
त्यांच्याही फोटोत गुंड दिसतात.
एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचे,
सगळ्यांचेच कंड दिसतात.

हल्ल्यावर प्रतिहल्ला करणे,
एवढेच हातात ऑप्शन आहे.
सगळ्यांच्या फोटो खाली मात्र,
अगदी सारखीच कॅप्शन आहे.

खंदे आहेत;बंदे आहेत,
याचेच तर खरे वांधे आहेत !
गुंडागर्दी आणि राजकारण,
जणू एकमेकांचे जोडधंदे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8474
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12फेब्रुवारी 2024
 

Sunday, February 11, 2024

गुंड म्हणाले गुंडांना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुंड म्हणाले गुंडांना

गुंडागर्दी आणि खुनखराब्याला, आता कुठे ‘रण आहे ? पोलिसांना सरळ सांगायचे, आ‘चे वैयक्तिक कारण आहे. आपल्या वैयक्तिक कारणांचे, कुणी राजकारण करणार नाही ! आपला वैयक्तिक राडा, आता कायदेभंग ठरणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3
11फेब्रुवारी 2024
-----------------------------
 

दैनिक वात्रटिका11फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -249 वा


दैनिक वात्रटिका
11फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -249 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

Saturday, February 10, 2024

दैनिक वात्रटिका10फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -248 वा


दैनिक वात्रटिका
10फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -248 वा 
पाने -44
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

कुत्र्यांचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
कुत्र्यांचा संवाद
आपण कुत्रे असलो तरी,
कुत्र्याच्या मौतीने मात्र मरू नये.
कुणाचा राजीनामा मागवा लागेल,
त्यामुळे तरी असे काही करू नये.
जो जो भी आता है...
वो वो हमकोही ठोकता है.
हम चिल्लाये तो भी बोलते है,
साला बहुत भोकता होता है.
सामान्य लोकांच्या मरणाची,
आपल्या मरणाशी तुलना आहे !
कुणीही तंगडी वर करण्यासाठी,
सगळ्यांकडूनच चालना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8473
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10फेब्रुवारी 2024

 

Friday, February 9, 2024

दैनिक वात्रटिका9फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -247 वा


दैनिक वात्रटिका
9फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -247 वा 
पाने -44
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

इज्जत का सवाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

इज्जत का सवाल

गोळी म्हणाली बंदूकीला,
तुझ्या हाती माझा चाप आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेला,
नेमका तुझा माझाच शाप आहे.

गुंडा - पुंडांच्या हातात,
तुझी माझी खेळणी आहे.
ज्यांनी आपली बाजू घ्यायची,
त्यांच्या तोंडात गुळणी आहे.

जणू स्वसंरक्षणाच्या ऐवजी,
थेट मारायचीच मुभा आहे !
आपल्याच इज्जतीचा प्रश्न,
आपल्या समोरच उभा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8472
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9फेब्रुवारी 2024
 

Thursday, February 8, 2024

दैनिक वात्रटिका8फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -246वा


दैनिक वात्रटिका
8फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -246वा 
पाने -44
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.

-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

अन्वयार्थ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अन्वयार्थ

नव नव्या आघाड्यांसारखीच,
नवनव्या पक्षांचे सूतोवाच आहे.
राजकीय उलथापालथीचा,
खरा अन्वयार्थ तर हाच आहे.

कुठे आघाडीच्या रेवड्या आहेत,
कुठे नव्या पक्षाच्या वावड्या आहेत.
राजकीय गमती जमती तर,
अगदी नको नको तेवढया आहेत.

एकमेकांची टिंगल टवाळी तरी,
जो तो म्हणतो आपलीच लाल आहे !
कुणाला कुणाची खात्री नाही,
हा राजकीय संक्रमण काल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8471
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8फेब्रुवारी 2024
 

Wednesday, February 7, 2024

दैनिक वात्रटिका7फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -245वा


दैनिक वात्रटिका
7फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -245वा 
पाने -44
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.

-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

निर्णयाची कॉपी-पेस्ट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निर्णयाची कॉपी-पेस्ट

काकाकडची पक्षीय सूत्र,
पुतण्याकडे सोपविण्यात आली.
निकालाची कारण मीमांसा,
मेरीटवरती खपविण्यात आली.

महाराष्ट्राच्या राजकारणात,
म्हणे नवा ट्विस्ट आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निर्णय,
शिवसेनेची कॉपी पेस्ट झाला आहे.

ज्यांच्या हाती मास्टर चावी आहे,
ते काहीही करवू शकतात !
अगदी घड्याळाचे काटे सुद्धा,
उलटे सुलटे फिरवू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8470
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7फेब्रुवारी 2024
 

Tuesday, February 6, 2024

दैनिक वात्रटिका6फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -244वा



दैनिक वात्रटिका
6फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -244वा 
पाने -44
अंक डाऊनलोड लिंक -

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.

-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

गुंडा - गर्दी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुंडा - गर्दी

राजकारणात चार दोन गुंड नाहीत,
राजकारणात गुंडांची गर्दी आहे.
राजकीय गुंडा - पुंडांना आवरताना,
हतबल मात्र खाकी वर्दी आहे.

गुंडा - पुंडांच्या साथीने,
प्रत्येक राजकीय पक्ष बाधला आहे.
सगळ्याच राजकीय पक्षांत घुसून,
राजकीय बॅलन्स साधला आहे.

वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो,
याचा भरवसा तरी कुठे आहे ?
तरीही राजकारण आणि गुंडागर्दी,
यांचे जगजाहीर साटे लोटे आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8469
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6फेब्रुवारी 2024
 

Monday, February 5, 2024

भारतरत्न आणि आक्षेप ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भारतरत्न आणि आक्षेप

जसा आपला भारत देश,
आपली आण,बाण,शान आहे.
तसा आपला भारत देश,
भारत रत्नांची मोठी खाण आहे.

आपल्या गौरवशाली परंपरेचे,
लोक जगभरात देऊ शकतात.
एका आठवड्यात दोन दोन,
भारतरत्न जाहीर होऊ शकतात.

समाजकारण आणि राजकारण,
यावरच पुरस्कार बेतले जातात !
म्हणूनच प्रत्यक्ष भारतरत्नावरतीही,
दरवर्षी आक्षेप घेतले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8469
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5फेब्रुवारी 2024
 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...