आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय समीकरण
बेरजेच्या राजकारणात,
निष्ठेची वजाबाकी होऊ लागली.
कुठून कुठून नेते मंडळी,
एकाच पक्षात जाऊ लागली.
सत्तेच्या गुणाकारात,
तत्वांचा भागाकार होत आहे.
हातचे बरोबर मोजले तरी,
चुकीचीच बेरीज होत आहे.
पक्षीय समतोल साधला तरी,
समीकरण काही सिद्ध होत नाही !
एकाच दर्शनाने काही,
कोणताच देव वृद्ध होत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8485
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment