Monday, February 12, 2024

फोटोतली गुंडागर्दी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फोटोतली गुंडागर्दी

यांच्या फोटोत गुंड दिसतात,
त्यांच्याही फोटोत गुंड दिसतात.
एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचे,
सगळ्यांचेच कंड दिसतात.

हल्ल्यावर प्रतिहल्ला करणे,
एवढेच हातात ऑप्शन आहे.
सगळ्यांच्या फोटो खाली मात्र,
अगदी सारखीच कॅप्शन आहे.

खंदे आहेत;बंदे आहेत,
याचेच तर खरे वांधे आहेत !
गुंडागर्दी आणि राजकारण,
जणू एकमेकांचे जोडधंदे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8474
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 30डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 211 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 30डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 211 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VWxwXc0ePcqGD9L0CIG...