Thursday, February 22, 2024

काळाची कसोटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काळाची कसोटी

कोण खरे? कोण खोटे?
कोण तकलादू? कोण बेगडे आहे?
काळाच्या कसोटी वरती,
सगळेच कसे उघडे नागडे आहे.

अगदी सगळ्यांना फसवता येते,
पण काळाला फसवता येत नाही.
कुणालाही गप्प बसू शकतात,
काळाला गप्प बसवता येत नाही.

काळ एवढा निष्ठुर की,
दुधाचे दूध पाण्याचे पाणी करतो !
ज्यांना तुम्ही दूधखुळे समजता,
त्यांना सुद्धा काळ ज्ञानी करतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8483
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...