आजची वात्रटिका
-------------------------
अन्वयार्थ
नव नव्या आघाड्यांसारखीच,
नवनव्या पक्षांचे सूतोवाच आहे.
राजकीय उलथापालथीचा,
खरा अन्वयार्थ तर हाच आहे.
कुठे आघाडीच्या रेवड्या आहेत,
कुठे नव्या पक्षाच्या वावड्या आहेत.
राजकीय गमती जमती तर,
अगदी नको नको तेवढया आहेत.
एकमेकांची टिंगल टवाळी तरी,
जो तो म्हणतो आपलीच लाल आहे !
कुणाला कुणाची खात्री नाही,
हा राजकीय संक्रमण काल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8471
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment