Tuesday, February 20, 2024

सक्ती,भक्ती आणि मुक्ती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
सक्ती,भक्ती आणि मुक्ती
नेत्यांच्या पक्षांतराच्या,
बातम्यांबरोबर वावड्या आहेत.
त्याचेच चांगभले आहे...
ज्यांच्याकडे गुळ खोबरे,
ज्यांच्याकडे रेवड्या आहेत.
अफवा आणि वावड्या,
जरा जास्तच खऱ्या होत आहेत.
कुणावर सक्ती होत असली तरी,
त्यांच्या इच्छा पुऱ्या होत आहेत.
सक्तीपोटी भक्ती आहे,
भक्तीसाठी राजकी युक्ती आहे !
शेवटचे दिवस तरी गोड जावेत,
यासाठी संकटातून मुक्ती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8481
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20फेब्रुवारी 2024

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...