आजची वात्रटिका
-------------------------
कॉपीचा रोग
देवी गेला;पोलिओ गेला,
कॉपी जायची शक्यता नाही.
कॉपीचा कायमचा बंदोबस्त,
काही व्हायची शक्यता नाही.
केजी पासून पीजी पर्यंत,
मागे कॉपीचे भूत आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये तर,
कॉपीला एकच उत आहे
त्याला पेपर कसे म्हणावे?
जो परीकक्षेपूर्वी फुटत नाही!
कॉपीशिवाय परीक्षासुद्धा,
परीक्षा काही वाटत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8486
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment