आजची वात्रटिका
-------------------------
अल्टी कल्टी आणि पलटी
कुणी दुतोंडे वाटू लागले,
कुणी तितोंडे वाटू लागले.
एकजात सगळेच्या सगळेच,
चक्क चिचोंडे वाटू लागले.
अलटी आहे;पलटी आहे,
प्रतिक्रिया उलटी सुलटी आहे.
कालच्या विधानावरून,
आज एकदमच कलटी आहे.
आपण जसे चक्रावून जातो,
त्यांची तशीच अवस्था आहे !
अल्टी कल्टी आणि पलटी,
ही राजकीय व्यवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8467
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment