Saturday, February 10, 2024

कुत्र्यांचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
कुत्र्यांचा संवाद
आपण कुत्रे असलो तरी,
कुत्र्याच्या मौतीने मात्र मरू नये.
कुणाचा राजीनामा मागवा लागेल,
त्यामुळे तरी असे काही करू नये.
जो जो भी आता है...
वो वो हमकोही ठोकता है.
हम चिल्लाये तो भी बोलते है,
साला बहुत भोकता होता है.
सामान्य लोकांच्या मरणाची,
आपल्या मरणाशी तुलना आहे !
कुणीही तंगडी वर करण्यासाठी,
सगळ्यांकडूनच चालना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8473
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10फेब्रुवारी 2024

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...