आजची वात्रटिका
-------------------------
गुंडा - गर्दी
राजकारणात चार दोन गुंड नाहीत,
राजकारणात गुंडांची गर्दी आहे.
राजकीय गुंडा - पुंडांना आवरताना,
हतबल मात्र खाकी वर्दी आहे.
गुंडा - पुंडांच्या साथीने,
प्रत्येक राजकीय पक्ष बाधला आहे.
सगळ्याच राजकीय पक्षांत घुसून,
राजकीय बॅलन्स साधला आहे.
वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो,
याचा भरवसा तरी कुठे आहे ?
तरीही राजकारण आणि गुंडागर्दी,
यांचे जगजाहीर साटे लोटे आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8469
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment