आजची वात्रटिका
-------------------------
पक्षीय कलम
कधी याला; कधी त्याला,
जाळ्यामध्ये घेरू लागले.
एका पक्षावर दुसऱ्या पक्षाचे,
राजकीय कलम करू लागले.
काही जाळे गोडी गुलाबीचे,
काही जाळे जुलमी आहेत.
काही राजकीय पक्ष तर,
एक नाही अनेक कलमी आहेत.
राजकीय कलम केलेले पक्ष,
बहुरंगी बहुढंगी वाटू लागले !
दररोज कोणत्या तरी पक्षाला,
नव नवीन कलम फुटू लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8479
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment