आजची वात्रटिका
-------------------------
भारतरत्न आणि आक्षेप
जसा आपला भारत देश,
आपली आण,बाण,शान आहे.
तसा आपला भारत देश,
भारत रत्नांची मोठी खाण आहे.
आपल्या गौरवशाली परंपरेचे,
लोक जगभरात देऊ शकतात.
एका आठवड्यात दोन दोन,
भारतरत्न जाहीर होऊ शकतात.
समाजकारण आणि राजकारण,
यावरच पुरस्कार बेतले जातात !
म्हणूनच प्रत्यक्ष भारतरत्नावरतीही,
दरवर्षी आक्षेप घेतले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8469
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment