Friday, August 7, 2026

फसवणुकीचा खेळ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
फसवणुकीचा खेळ
फसवा फसवीचे खेळ सुरू,
बघा कोण कुणाला फसवतो आहे?
फसवूनही न फसवल्याचे,
बघा नेमके कोण भासवतो आहे?
जणू फसवण्यातही स्वार्थ आहे,
जणू फसवून घेण्यातही स्वार्थ आहे.
जणू फसवणुकीच्या खेळाचा,
एवढाच खरा राजकीय अर्थ आहे.
कधी वाटते हा बाजारबसवा आहे,
कधी वाटते तो बाजारबसवा आहे!
फसवणुकीचचा सगळा खेळ,
जणू सगळ्यांसाठीच फसवा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9361
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7ऑगस्ट 2026

 

Thursday, August 6, 2026

दैनिक वात्रटिका l 5 ऑगस्ट 2026वर्ष- सहावे अंक - 36 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  5 ऑगस्ट 2026
वर्ष- सहावे 
अंक - 36 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -375
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

गुंगी गुडियाच्या निमित्ताने ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
गुंगी गुडियाच्या निमित्ताने
आपल्या राजकीय टिका प्रतिटिकेची,
परंपरा समृद्ध आणि बढीया आहे.
ऐतिहासिक टीकेची पुनरावृत्ती झाली,
ती टीका म्हणजे 'गुंगी गुडिया' आहे.
कुणाला मौनी बाबा म्हटले गेले होते,
पप्पू तर म्हणाला,चौकीदार चोर आहे.
राजकीय टीका प्रतिटीकेच्या बाबतीत,
इथे प्रत्येकजण शेरास सव्वाशेर आहे.
राजकीय टीका व्हावी;प्रतिटीका व्हावी,
ज्याची त्याची प्रतिष्ठाही जपली पाहिजे!
आपण इतरांवरती टीका केली तर,
आपल्यावरचीही टीका झेपली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9360
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट 2026

Wednesday, August 5, 2026

दैनिक वात्रटिका l 4 ऑगस्ट 2026वर्ष- सहावे अंक - 35 वा l पाने -54


दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  4 ऑगस्ट 2026
वर्ष- सहावे 
अंक - 35 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -374
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

खोटारडेपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
खोटारडेपणा
किरकोळ किरकोळ विषयसुद्धा,
आजकाल वादग्रस्त ठरत आहे.
ज्याला संधी मिळेल त्याच्याकडून,
बिनधास्तपणे राईचा पर्वत आहे.
एकदा राईचा पर्वत झाला की,
सुतावरून स्वर्ग गाठणे सोपे जाते.
कितीही बिनबुडाचे असले तरी,
आपलेच म्हणणे रेटणे सोपे जाते.
एकदा आपलेच म्हणणे रेटले की,
आपली रेटारेटी चालू ठेवली जाते!
उठता बसता आपली जीभ,
पुन्हा पुन्हा टाळ्याला लावली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9359
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5ऑगस्ट 2026

 

Tuesday, August 4, 2026

प्रवक्ते ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
प्रवक्ते
ज्याचे त्याचे हिशोब,
दररोज चुकते असतात.
एवढ्याच कामासाठी तर,
पक्षाचे प्रवक्ते असतात.
प्रवक्ते पदाच्या नावाखाली,
रात्रंदिवस भोंगे असतात.
आम्ही नाही त्यातले...
प्रवक्त्यांचे सोंगे असतात.
प्रत्येकाला उगीच वाटत राहते,
प्रवक्ते म्हणजे तोफा असतात !
प्रवक्ते कुणाचेही असोत,
त्यांच्या तोंडच्या वाफा असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9358
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4ऑगस्ट 2026

 

Monday, August 3, 2026

अतृप्त ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
अतृप्त
सत्तेच्या राजकारणात,
ना कुणी साधू;ना कुणी संत आहे.
नको तेवढी सत्ता भोगूनही,
ज्याची त्याची वेगळी खंत आहे.
ज्याच्या त्याच्या राजकीय खंतेला,
ना कधीच कसलाच अंत आहे.
म्हणूनच सर्व राजकीय पक्षांमध्ये,
असंतुष्टांचा राजकीय पंथ आहे.
संतुष्ट नावाचा शब्दच जणू,
त्यांच्या राजकीय शब्दकोशात नाही !
सत्तातृप्त राजकीय आत्मा,
अजून तरी आपल्या देशात नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9357
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट 2026

Sunday, August 2, 2026

बंडखोरांच्या टोळ्या.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
बंडखोरांच्या टोळ्या
कुणी परत यायला लागले,
कुणी परत जायला लागले.
ज्यांना पक्षात घेणार नव्हते,
त्यांनाच परत घ्यायला लागले.
आपल्यासाठी धक्कादायक,
त्यांना आवक-जावक सोपी आहे.
जाणारे येणारे खुशीत,
निष्ठावंतांची मात्र गळचेपी आहे.
एकूणच काय तर सगळीकडे,
निवडून येणाऱ्यांच्या मोळ्या आहेत !
आघाड्या आणि युत्या म्हणजे,
बंडखोरांच्या टोळ्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9356
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट 2026

 

Saturday, August 1, 2026

भ्रष्टाचाराचा भस्मासुर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
भ्रष्टाचाराचा भस्मासुर
भ्रष्टाचाराचे आकडे बघून,
आपले डोळे फुटायची पाळी आहे.
भ्रष्टाचाऱ्याची भ्रष्टाचाऱ्यांना,
रोज मोठ्या दिमाखात टाळी आहे.
भ्रष्टाचाऱ्यांसाठी भ्रष्टाचार म्हणजे,
आपल्या हक्काचा खाऊ आहे.
रकमेचे आकडे मोजताना,
तुमच्या आमच्या नाकी नऊ आहे.
भ्रष्टाचार म्हणजे लॉटरी,
भ्रष्टाचार म्हणजे मटका आहे !
अगदी रंगेहात सापडूनसुद्धा,
भ्रष्टांची पुराव्याअभावी सुटका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9355
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 ऑगस्ट 2026
 

फसवणुकीचा खेळ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- फसवणुकीचा खेळ फसवा फसवीचे खेळ सुरू, बघा कोण कुणाला फसवतो आहे? फसवूनही न फसवल्याचे, बघा नेमके कोण भासवतो...