Wednesday, August 5, 2026

खोटारडेपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
खोटारडेपणा
किरकोळ किरकोळ विषयसुद्धा,
आजकाल वादग्रस्त ठरत आहे.
ज्याला संधी मिळेल त्याच्याकडून,
बिनधास्तपणे राईचा पर्वत आहे.
एकदा राईचा पर्वत झाला की,
सुतावरून स्वर्ग गाठणे सोपे जाते.
कितीही बिनबुडाचे असले तरी,
आपलेच म्हणणे रेटणे सोपे जाते.
एकदा आपलेच म्हणणे रेटले की,
आपली रेटारेटी चालू ठेवली जाते!
उठता बसता आपली जीभ,
पुन्हा पुन्हा टाळ्याला लावली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9359
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5ऑगस्ट 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...