आजची वात्रटिका
----------------------------
पेपरफुटीचा उतारा
कालही पेपर फुटत होते,
आजही पेपर फुटत आहेत.
राजीनामा देऊन घेऊन,
सांगा प्रश्न कुठे सुटत आहेत?
बेईमानीची दुनिया सारी,
इमानदारीवर पोतारा आहे.
स्पर्धा नावाच्या संघर्षावर,
पेपरफुटीचा उतारा आहे.
दाम करी काम वेड्या,
इमानदारीत राम नाही !
पेपरफुटी कोणतीही असो,
ते गोरगरिबाचे काम नाही!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9381
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment