Monday, August 31, 2026

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
षडयंत्र
शांतता आणि सुव्यवस्थेला
सगळीकडूनच धक्का आहे.
साध्या साध्या प्रकरणांवरही,
जाती धर्माचा शिक्का आहे.
जाती-धर्माचे शिक्के मारण्याचे,
मोठे घातक असे वेड आहे.
किरकोळ सारकोळ गोष्टीवरून,
समाजात समाजात तेढ आहे.
ज्यांची त्यांची वेगवेगळी,
कट कारस्थाने शिजल्या जातात!
जाती धर्माची शिक्के मारून,
आपल्या पोळ्या भाजल्या जातात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9384
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...