आजची वात्रटिका
----------------------------
शुगर आणि बीपी
अचानक वाढलेली शुगर बघून,
बीपीसुद्धा खालीवर होतो आहे.
वाढत्या महागाईचा परिणाम,
सामाजिक स्वास्थ्यावर होतो आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठीच,
ऑइल फ्री जेवणाचा सल्ला आहे.
आगीत तेल ओतावे तसा,
गाडीवर इथेनॉलचा हल्ला आहे.
कुणाला महागाई पोसावी लागते,
कुणाला महागाई सोसावी लागते !
आपल्याला अच्छे दिन येण्यासाठी,
आपल्यालाच घासावी लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9379
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment