Saturday, August 1, 2026

भ्रष्टाचाराचा भस्मासुर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
भ्रष्टाचाराचा भस्मासुर
भ्रष्टाचाराचे आकडे बघून,
आपले डोळे फुटायची पाळी आहे.
भ्रष्टाचाऱ्याची भ्रष्टाचाऱ्यांना,
रोज मोठ्या दिमाखात टाळी आहे.
भ्रष्टाचाऱ्यांसाठी भ्रष्टाचार म्हणजे,
आपल्या हक्काचा खाऊ आहे.
रकमेचे आकडे मोजताना,
तुमच्या आमच्या नाकी नऊ आहे.
भ्रष्टाचार म्हणजे लॉटरी,
भ्रष्टाचार म्हणजे मटका आहे !
अगदी रंगेहात सापडूनसुद्धा,
भ्रष्टांची पुराव्याअभावी सुटका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9355
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 ऑगस्ट 2026
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...