आजची वात्रटिका
----------------------------
इज्जत का सवाल
वाचाळवीरांच्या जोडीला,
एकसे बढकर एक जोड आहे.
कोण जास्त घसरू शकतो?
वाचाळवीरांमध्ये चढाओढ आहे.
एक वाचाळवीर घसरला की,
दुसरे वाचाळवीर घसरू लागले.
वाचाळांच्या घसरा-घसरीचे लोण,
सर्वत्र जोर जोरात पसरू लागले.
वाचाळवीरांच्या घसराघसरीत,
कुचाळवीरांना मोठी लज्जत आहे !
वाचाळवीरांच्याच हातामध्ये,
स्वतःबरोबर भाषेची इज्जत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9368
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment