आजची वात्रटिका
--------------------
प्रवक्ते
ज्याचे त्याचे हिशोब,
दररोज चुकते असतात.
एवढ्याच कामासाठी तर,
पक्षाचे प्रवक्ते असतात.
प्रवक्ते पदाच्या नावाखाली,
रात्रंदिवस भोंगे असतात.
आम्ही नाही त्यातले...
प्रवक्त्यांचे सोंगे असतात.
प्रत्येकाला उगीच वाटत राहते,
प्रवक्ते म्हणजे तोफा असतात !
प्रवक्ते कुणाचेही असोत,
त्यांच्या तोंडच्या वाफा असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9358
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment