Monday, August 3, 2026

अतृप्त ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
अतृप्त
सत्तेच्या राजकारणात,
ना कुणी साधू;ना कुणी संत आहे.
नको तेवढी सत्ता भोगूनही,
ज्याची त्याची वेगळी खंत आहे.
ज्याच्या त्याच्या राजकीय खंतेला,
ना कधीच कसलाच अंत आहे.
म्हणूनच सर्व राजकीय पक्षांमध्ये,
असंतुष्टांचा राजकीय पंथ आहे.
संतुष्ट नावाचा शब्दच जणू,
त्यांच्या राजकीय शब्दकोशात नाही !
सत्तातृप्त राजकीय आत्मा,
अजून तरी आपल्या देशात नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9357
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट 2026

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...