Thursday, August 20, 2026

काळजीस कारण की ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
काळजीस कारण की
आंदोलनाविरुद्ध प्रतिआंदोलन,
आरोपाविरुद्ध प्रतिआरोप आहे.
उद्याच्या घातक भविष्याचा,
वर्तमानाला सूचक निरोप आहे.
आपलीच झालेली गोची बघून,
लोकशाहीसुद्धा थक्क आहे.
सगळ्यांनाच मान्य करावे लागते,
आंदोलन संविधानिक हक्क आहे.
कोणताही विधायक लढा,
विध्वंसक मार्गाने जाऊ नये !
लोकशाहीच्याच मार्गाने,
लोकशाहीचा पराभव होऊ नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9373
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 ऑगस्ट 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 20 ऑगस्ट 2026वर्ष- सहावे अंक - 41 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...