Sunday, December 31, 2023

दैनिक वात्रटिका31डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -207 वा


दैनिक वात्रटिका
31डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -207 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

अवमूल्यन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अवमूल्यन

निष्ठावंत सारख्या शब्दांचे अर्थ,
किती खाली खाली आले आहेत.
गद्दार आणि स्वाभिमानी,
हेच समानार्थी शब्द झाले आहेत.

निष्ठावंतांपेक्षा गद्दारांचाच,
आज राजकारणात वट आहे.
स्वतःबरोबर शब्दांच्याही,
किंमतीमध्ये खूप मोठी घट आहे.

जेवढी असते अडी-नडीची वेळ,
तेवढी गद्दारांना किंमत येत !
स्वतःला स्वाभिमानी म्हणायला,
म्हणूनच गद्दारांना हिंमत येते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8436
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31डिसेंबर2023
 

Saturday, December 30, 2023

दैनिक वात्रटिका30डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -206 वा


दैनिक वात्रटिका
30डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -206 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

चलो बुलावा आया है...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चलो बुलावा आया है...

राजकीय वादविवाद झाले,
एकमेकांचे मान अपमान झाले.
हो... नाही... म्हणता..म्हणता..
एकदाचे अयोध्येचे निमंत्रण आले.

सत्ता वनवासी आहेत त्यांना आले,
जे सत्तेमध्ये आहेत त्यांनाही आले.
त्यांना आले आले म्हणता म्हणता,
धक्कादायकपणे यांनाही आले.

चलो बुलावा आया है....
त्यांना त्यांना आमचा सल्ला आहे !
राजकीय रामायण बाजूला ठेवा,
तुमच्या प्रतीक्षेत रामलल्ला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8435
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30डिसेंबर2023
 

Friday, December 29, 2023

दैनिक वात्रटिका 29डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -205 वा


दैनिक वात्रटिका
29डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -205 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

देवा - धर्माचा धंदा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

देवा - धर्माचा धंदा

देवाचा आणि धर्माचा धंदा,
आपल्या देशाला काही नवा नाही.
देवाधर्माचा धंदा करणाऱ्या विषयी,
आमच्याही मनात काही हेवा नाही.

कुणी श्रद्धेची नशा दिली की,
जनताही त्यालाच भुलती आहे.
लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच,
देव - धर्माच्या धंद्याला चलती आहे.

लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे,
धंद्याबरोबर राजकारण जोरात आहे !
ज्याचे त्याचे स्वार्थकारणही,
ज्याच्या त्याच्या उरात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8434
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
 

Thursday, December 28, 2023

दैनिक वात्रटिका28डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -204 वा


दैनिक वात्रटिका
28डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -204 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

राजकीय स्पर्धा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय स्पर्धा

यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या,
मोर्चे विरुद्ध मोर्चे निघू लागले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून,
लोककल्याणाला लागू लागले.

त्यांच्याबरोबर यांचाही,
लोककल्याणाचाच विचार आहे.
एकमेकांना हिणवू लागले,
हा निवडणुकीचाच प्रचार आहे.

प्रचार करा;अपप्रचार करा,
तो तुमचा लोकशाही हक्क आहे !
तुम्हांला लोक कळालेच नाहीत,
हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8433
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28डिसेंबर2023
 

Wednesday, December 27, 2023

दैनिक वात्रटिका27डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -203 वा


दैनिक वात्रटिका
27डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -203 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

शत्रूत्व संहिता ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शत्रूत्व संहिता

जर असे वाटत असेल की,
अंडीपिल्ली बाहेर येवू नयेत.
तर आपल्याच मित्रांचे,
चुकूनही शत्रू होवू देवू नयेत.

शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल,
पण मित्रांचे शत्रूत्व झेपत नाही.
कारण कपड्यांच्या आतलेही,
तिथे काहीसुद्धा लपत नाही.

मग आपलीच आपल्या सोबत,
सतत लपाछपी खेळावी लागते !
आपलीच सावलीसुद्धा,
आपल्यालाच टाळावी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8432
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27डिसेंबर2023
 

Tuesday, December 26, 2023

दैनिक वात्रटिका26डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -202 वा


दैनिक वात्रटिका
26डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -202 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

अंदाज पंचे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अंदाज पंचे....

निवडणूक पूर्व अंदाजावरून,
एकमेकांना खेटायला लागले.
अंदाज पंचे दहावो दर्शे करीत,
आपलाच पक्ष रेटायला लागले.

अंदाजावर भाष्य करणारे,
जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत.
ही सगळी रंगीत स्वप्ने,
खरोखरच शेखचिल्लीचे आहेत.

ते जागांचे अंदाज सांगून मोकळे,
साधी निवडणुकांची वाट नाही !
अजून घोडा आणि मैदान यांची,
साधी नावालासुद्धा गाठ नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8431
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26डिसेंबर2023
 

Monday, December 25, 2023

दैनिक वात्रटिका25डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -201 वा


दैनिक वात्रटिका
25डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -201 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

उपोषण सम्राट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उपोषण सम्राट

उपोषणावर उपोषण,
थेट प्रसिद्धीच्या झोतात आहे.
अण्णांचा उपोषणाचा विक्रम,
आता मोडायच्या बेतात आहे.

संविधानिक मार्गांचेही,
आता भलतेच थाटमाट आहेत.
नवी मागणी;नवे आंदोलनं,
रोज नवे उपोषण सम्राट आहेत.

मागण्यांचे बुक बसत गेले की,
गिनीज बुक जवळ येऊ लागते !
गांभीर्य कमी कमी होत जाऊन,
उपोषणाचेही हसू होऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8430
दैनिक झुंजार नेता
वर्ष -21वे
25डिसेंबर2023
 

Sunday, December 24, 2023

दैनिक वात्रटिका24डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -200 वा


दैनिक वात्रटिका
24डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -200 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

अस्थिर भविष्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अस्थिर भविष्य

जे काल एकत्र लढलेले,
उद्या ते वेगवेगळे लढू शकतात.
काल वेगळे लढलेले एकत्र येतील,
असेही प्रकार इथे घडू शकतात.

त्यांची त्यांनाच खात्री नाही,
उद्या नेमके काय होऊ शकते ?
आज एक ठरविले तरी,
येणारी वेळच उत्तर देवू शकते.

स्वतःचे मालक कुणीच नाहीत,
मागे बोलविते धनी आहेत !
ते बोलत एक असले तरी,
वेगळेच विचार मनोमनी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8429
दैनिक झुंजार नेता
वर्ष -21वे
24डिसेंबर2023
 

Saturday, December 23, 2023

दैनिक वात्रटिका23डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -199 वा


 दैनिक वात्रटिका
23डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -199 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

भक्ती प्रपंच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भक्ती प्रपंच

गरज पडेल तेव्हा,
भक्तांची भक्ती आळवली जाते.
गरज पडेल तेव्हा,
भक्तांची भक्ती खेळवली जाते.

पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे,
भक्तांची भक्ती भाळवली जाते.
भक्तांना क्रॉस चेक करत,
भक्तांची भक्ती चाळवली जाते.

भक्तांना गुलाम करण्याची,
दरवेळी नवी नवी युक्ती असते !
जी भक्तांना नाचवू शकते,
ती फक्त भक्ती आणि भक्ती असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8428
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23डिसेंबर2023
 

Friday, December 22, 2023

दैनिक वात्रटिका22डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -198 वा


 दैनिक वात्रटिका
22डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -198 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

शांतता म्हणाली कायद्याला,...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शांतता म्हणाली कायद्याला,

तुला यायचं तर राग येऊ दे,
तुझ्यामुळे माझी ही अवस्था आहे.
वर तू म्हणायला मोकळा,
सगळी कशी सुव्यवस्था आहे.

वरवर शांतता असली तरी,
आत मध्ये मात्र अशांतता आहे.
तू कितीही कडक दिसलास तरी,
तुझ्यामध्ये मात्र संथता आहे.

तुला आणि मलाही कळते,
हे सगळे नेमके कसे होते आहे?
आपल्या दोघांचे मात्र,
सदा न कदा असे होते आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8426
दैनिक झुंजार नेता
वर्ष -21वे
22डिसेंबर2023
 

Thursday, December 21, 2023

दैनिक वात्रटिका21डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -197 वा


 दैनिक वात्रटिका
21डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -197 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

अपक्ष भाव..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अपक्ष भाव

कसली श्रेष्ठी अहे?
कसले हाय कमांड आहे?
एका एका अपक्षाला,न
को तेवढे डिमांड आहे.


सत्तेचे राजकारण,
अपक्षां भोवती फिरू लागले !
पक्षा-पक्षातले नेते मग,
अपक्षांवर झुरू लागले !!

-सूर्यकांतडोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.९९२३८४७२६९

उपराष्ट्रपतींची मिमिक्री...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------


उपराष्ट्रपतींची मिमिक्री

सभागृहाबाहेर मिमिक्री होतीच,
आता सभागृहातही मिमिक्री आहे.
लोकशाही परंपरांच्या बाबतीत,
सगळेच्या सगळे बेफिक्री आहेत.

मिमिक्री एक कला असली तरी,
तिचीच करणारावरती बला आहे.
म्हणे उपराष्ट्रपती पदाबरोबर,
सगळ्यांचाच अपमान झाला आहे.

भारतीय राजकारणात,
रोज नवे नवे ट्विस्ट  येत आहेत!
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले,
आता मिमिक्री आर्टिस्ट होत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8427
दैनिक झुंजार नेता
वर्ष -21वे
20डिसेंबर2023

 

Wednesday, December 20, 2023

दैनिक वात्रटिका20डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -196 वा


दैनिक वात्रटिका
20डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -196 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

निलंबनास्त्र ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निलंबनास्त्र

आपल्या संसदेच्या सुरक्षेवर,
घुसखोरांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.
घुसखोरांच्या घुसखोरीने,
खासदारांना बाहेर हुसकावले आहे.

घुसखोरी आणि हुसकावणी,
याच्यामध्येच ग्यानबाची मेख आहे.
खासदारांच्या निलंबनाची घटना,
ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक आहे.

कशात काय ? फाटक्यात पाय,
इथे दोघांमध्ये तिसरा आहे !
जणू खासदारांच्या मुस्कटदाबीसाठी,
निलंबनास्त्राचा आसरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8426
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20डिसेंबर2023
 

Tuesday, December 19, 2023

दैनिक वात्रटिका19डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -195 वा


 दैनिक वात्रटिका
19डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -195 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

दाऊद आणि विषप्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दाऊद आणि विषप्रयोग

पुन्हा पुन्हा एकच प्रकार,
कितीतरी वेळा झाला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम,
जिवंत होऊन अनेकदा मेला आहे.

पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो,
तोच तर खरा अंधा आहे.
खात्री व्हायच्या आधीच बातमी येते,
दाऊद इब्राहिम जिंदा आहे.

दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण,
खूप गांभीर्याने घेतले जाईल !
पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा,
आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-84225
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19डिसेंबर2023
 

Monday, December 18, 2023

दैनिक वात्रटिका18डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -194 वा


 दैनिक वात्रटिका
18डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -194 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

स्वर्थी विचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

स्वर्थी विचार

एकदा स्वार्थ सुरू झाला की,
मग कशालाही अर्थ उरत नाही.
बुद्धी कोणाचीही असली तरी,
ती स्वार्थापुढे काम करत नाही

एकदा स्वार्थी एक झाले की,
स्वार्थही अस्मिता बनली जाते !
फक्त आपली आणि आपलीच,
गोष्ट खरी मानली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-84224
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18डिसेंबर2023
 

Sunday, December 17, 2023

लोकशाही सत्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकशाही सत्य

आपापल्या हुकुमशाहीला,
लोकशाहीचे लेबल आहे.
हा प्रकार फक्त लोकल नाही,
हा प्रकार ग्लोबल आहे.

कुणाला याचा आनंद होतो,
कुणाकुणाला याची खंत आहे !
हुकुमशाहीच्या नावाखाली तरी,
आज लोकशाही जिवंत आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-84223
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17डिसेंबर2023
 

दैनिक वात्रटिका17डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -193 वा


दैनिक वात्रटिका
17डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -193 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

Saturday, December 16, 2023

दैनिक वात्रटिका16डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -192वा


 दैनिक वात्रटिका
16डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -192वा 
अंक डाऊनलोड लिंक -
-----------------------

मुद्द्याचे बोला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुद्द्याचे बोला

आरोपांच्या जाळ्यात अडकवून,
ते एकमेकांची जिरवू लागले.
आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात,
विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले .

फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका,
जनतेसाठीही आवाज उठवत चला !
लिंकनची लोकशाहीची व्याख्या,
विधीमंडळात तरी आठवत चला !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8420
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16डिसेंबर2023
 

Friday, December 15, 2023

दैनिक वात्रटिका15डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -191 वा


 दैनिक वात्रटिका
15डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -191 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

पीएचडीचे दिवे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पीएचडीचे दिवे

पीएचडी करून काय दिवे लावणार?
हा तर मोठ्या संशोधनाचा विषय आहे.
पण कितीही नाही म्हटले तरी,
विधानात टवाळकीचा आशय आहे.

कालच्या त्या धरणाची चर्चा,
आता आता कुठे ओसरते आहे.
कितीही आत्मकलेश केले तरी,
गाडी पुन्हा नको तिकडे घसरते आहे.

हश्या मिळेल;टाळ्याही मिळतील,
सोबत फटकळपपणाही सिद्ध होईल !
पुन्हा नव्याने आत्मक्लेष केला तर,
आत्मक्लेषाचीसुद्धा हद्द होईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8421
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15डिसेंबर2023
 

Thursday, December 14, 2023

दैनिक वात्रटिका14डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -190 वा


 दैनिक वात्रटिका
14डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -190 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

राजकीय पत्रा-पत्री ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय पत्रा-पत्री

अत्र.. तत्र.....अगदी सर्वत्र,
चर्चेत फक्त पत्र एके पत्रं आहेत.
कुणी एकमेकांचे विरोधक,
कुणी कुणी तर चक्क मित्र आहेत.

मोबाईलच्या जमान्यातही,
सर्वांची पत्रा-पत्री रंगते आहे.
ज्याला त वरून ताकभात कळतो,
त्यालाच ती काहीतरी सांगते आहे.

कुणाकुणासाठी पत्रा पत्री म्हणजे,
जुन्या जमान्यातील बाब आहे !
लोक काही उगीच म्हणीत नाहीत,
सध्याचा जमानाच खराब आहे ! !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8419
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14डिसेंबर2023
 

Wednesday, December 13, 2023

अस्थिरता.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अस्थिरता

सरकार पडण्याचा मुहूर्त,
विरोधकांकडून काढला जातो.
विरोधकांचा उताविळपणाही,
विरोधकांना नडला जातो.

कसे आणि कधी पडणार?
बादरायण संबंध जोडावा लागतो.
सरकार पडले नाही की,
नवा मुहूर्तही काढावा लागतो.

अफवा आणि वावड्यांचेही,
खास सूत्रांकडून लोण आहे !
सरकार की विरोधक?
सांगा नेमके अस्थिर कोण आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8418
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13डिसेंबर2023

दैनिक वात्रटिका13डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -189 वा


दैनिक वात्रटिका
13डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -189 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

Tuesday, December 12, 2023

दैनिक वात्रटिका12डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -188 वा


 दैनिक वात्रटिका
12डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -188 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

सोशल मीडियाचे अभंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
सोशल मीडियाचे
अभंग
लाईक घ्यावे,लाईक द्यावे,
खूप भारी आयडिया l
यावरती सोशल मीडिया,
चालतसे....ll 1 ll
अकाउंट फेक,डीपीही फेक,
बाया बापड्यांचा चाळा l
सारे रिकामटेकडे गोळा,
ग्रुपोग्रुपी.......ll. 2 ll
कुणी अंधे,कुणी मिंधे,
सारी भाडोत्री पिलावळ l
चाले ट्रोलींगचा खेळ,
रात्रंदिवस...ll 3 ll
सिटिझन आणि नेटीझन,
कसे सोसावे आभास l
आर्टिफिशियल इंटेलिजन्स?
सूर्य म्हणे.....ll 4 ll
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -23वे
12डिसेंबर2023

 

Monday, December 11, 2023

दैनिक वात्रटिका11डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -187 वा


 दैनिक वात्रटिका
11डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -187 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

सार्वकालिक सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
सार्वकालिक सत्य
कधी टोमॅटोचा रेंदा असतो,
कधी कांद्याचा वांधा असतो.
प्रकार बारा महिने तेरा त्रिकाळ,
अगदी चांदा ते बांदा असतो.
जशी कधी असते आयातबंदी,
तशी कधी निर्यातबंदी असते.
जमला सगळाच मेळ तर,
निसर्गाचीसुद्धा अंदाधुंदी असते.
आलटून पालटून सगळेच,
शेतकऱ्यांच्या बाजूने दिसू लागतात !
त्यात राजकारण घुसले की,
अकलेचे कांदे;वांगे वासू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8417
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11डिसेंबर2023

 

Sunday, December 10, 2023

दैनिक वात्रटिका10डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -186 वा


 दैनिक वात्रटिका
10डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -186 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

राष्ट्रवादी ते राष्ट्रद्रोही

आजची वात्रटिका
-------------------------

राष्ट्रवादी ते राष्ट्रद्रोही

राष्ट्रवादी हवे आहेत,
पण राष्ट्रद्रोही नको आहेत.
खुल्या पत्रातील भावनांचे,
सगळीकडूनच इको आहेत.

ए मालिक तेरे बंदे हम,
ए मालिक तेरे खंदे हम.
डोळे असूनही दिसत नाही,
ए मालिक कितने गंदे हम?

कुणी नवाब असले तर असले,
प्रश्न राजकीय सत्वाचा आहे!
बरे झाले हे तरी कळाले,
सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8416
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10डिसेंबर2023
 

Saturday, December 9, 2023

दैनिक वात्रटिका9डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -185 वा


दैनिक वात्रटिका
9डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -185 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

भांडा सौख्यभरे......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भांडा सौख्यभरे...

सत्ताधारी आणि विरोधक,
एकमेकांना खिंडीत गाठू लागले.
जसे शेराला सव्वाशेर,
अगदी चॅलेंज देत देत भेटू लागले.

शेराला सव्वाशेर ठरण्यातच,
अधिवेशनाचा वेळ पाण्यात आहे.
अगदी रोखठोक वाटावा,
असा आवेश त्यांच्या बाण्यात आहे.

परस्परांच्या सवालाला,
त्यांनी रोखठोक जवाब द्यावा !
पण दोघांच्या भांडणांमध्ये,
सामान्य जनतेचा लाभ व्हावा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8415
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9डिसेंबर2023
 

Friday, December 8, 2023

दैनिक वात्रटिका8डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -184 वा

दैनिक वात्रटिका
8डिसेंबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -184 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

थिअरीचे प्रॅक्टिकल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------------

थिअरीचे प्रॅक्टिकल

प्रत्येकाला आपल्या प्रतिष्ठेचे,
वेळी अवेळी मोह होतात.
जसे शहाचे होतात काटशह,
तसे काटशहाचे शह होतात.

जसे शत्रूंशी मित्रांचे,
तसे मित्रांचे मित्रांशी द्रोह होतात.
समोर समोर लढाई तरी,
आतून मात्र छुपे तह होतात.

जसे प्रॅक्टिकल वेगळे,
तशी थिअरीही वेगळी असते!
आपली मोरी असली तरी,
चोरी सगळीच्या सगळी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8414
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8डिसेंबर2023

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...