Monday, May 4, 2026

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
उदात्तीकरणाचे प्रयोग
अनिष्ट आणि घातक परंपरांचे,
एक मात्र खूप छान असते.
अनिष्ट आणि घातक परंपरांना,
उदात्तीकरणाचे वरदान असते.
जे मोठ्या लोकांनी केले,
तेच छोटे छोटे लोक करू लागतात.
ऐपत आणि लायकी नसूनही,
मोठ्या लोकांची वाट धरू लागतात.
उदातीकरणाचे शाही प्रयोग,
सामान्य लोकांनी विसरायला हवेत !
आपापले अंथरून बघून,
प्रत्येकाने पाय पसरायला हवेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका 9266
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 मे 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...