Saturday, May 16, 2026

पेपर फुटीचा भावार्थ ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
पेपर फुटीचा भावार्थ
परीक्षेच्या पेपरफुटीचा हैदोस,
हा काही पहिला वहिला नाही.
फुटायचा राहिला आहे असा,
कोणताच पेपर राहिला नाही.
फोडणारे आणि घेणारे आहेत,
तोपर्यंत पेपरफुटीला मरण नाही.
संन्याशाला फाशी देण्यात,
कसलेसुद्धा कारण नाही.
जे सापडले तेच चोर,
बाकी सगळेच्या सगळे साव आहेत!
आपण फक्त आश्चर्याने विचारायचे,
कोणत्या पेपरचे काय भाव आहेत?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9278
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 मे 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...