Wednesday, May 6, 2026

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
युद्ध प्रसंग
पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था,
इंधन भरू किंवा मरू आहे.
इंधन टंचाईमुळे खात्री झाली,
आखाती युद्ध अजूनही सुरू आहे.
युद्ध ही गोष्ट कधीही वाईटच,
पण एक गोष्ट मात्र बेस्ट झाली.
सामुद्रधुनी ही संकल्पना,
अगदी उदाहरणासहित स्पष्ट झाली.
युद्ध कुणालाच परवडत नाही,
तरीही पुन्हा पुन्हा युद्ध होऊ शकते !
उत्पादकांच्या युद्ध साहित्याचे,
मार्केट नक्की डाऊन होऊ शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9268
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 मे 2026

 

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...