आजची वात्रटिका
--------------------------
पण लक्षात कोण घेतो?
त्यांचे मतभेद फेक असतात,
त्यांचे वाद-विवाद फेक असतात.
जनतेत वाद लावणारे,
आतून मात्र सारेच एक असतात.
दिसते तसे असतेच असे नाही,
असते तसे दिसतेच असे नाही.
पुन्हा पुन्हा फसून सुद्धा,
तुम्हा आम्हाला कळतेच असे नाही.
आपण शहाणे असलो तर,
ते पक्के दीड शहाणे असतात !
आपली फसवणूक ठरलेली,
दरवेळी नवे नवे बहाणे असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9269
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 मे 2026

No comments:
Post a Comment