आजची वात्रटिका
--------------------------
टक्क्यांची कुजबुज
दहावीचा निकाल बघून,
सुरुवात धक्क्यावर धक्क्यांना.
तरीही सगळे स्पोर्टली घेऊ
टक्के म्हणाले टक्क्यांना.
जिकडे बघावे तिकडे,
आपलाच आलेख चढता आहे.
तुझा माझा आवाज,
कितीतरी टक्क्यांनी वाढता आहे.
कुणाच्याही यशाच्या आनंदात,
आपला काही मिठाचा खडा नाही !
पण टक्केवारी म्हणजेच गुणवत्ता,
याच्यासारखा दुसरा राडा नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9271
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 मे 2026

No comments:
Post a Comment