Wednesday, May 13, 2026

गेस पेपर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
--------------------------
गेस पेपर
सगळ्याच गेस पेपरचे अंदाज,
जास्तच खरे ठरायला लागले.
परीक्षेच्या आधीच गेस पेपर,
मोबाईलवरून फिरायला लागले.
गेस पेपरचे अंदाज बघून,
व्यवस्थेच्या तोंडाला फेस आहे.
पेपरची फुटाफूट सिद्ध व्हायचे,
नेमके अजून काय शेष आहे ?
गेस पेपरच्या अंदाजांची,
सारखीच तऱ्हा पुन्हा पुन्हा आहे !
अंदाजावरती शिक्कामोर्तब झाले,
पेपरफुटी हा संघटित गुन्हा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9275
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 मे 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...