Tuesday, May 19, 2026

नीट पुराण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
नीट पुराण
पैसा फेको तमाशा देखो,
अशीच जणू ऑफर आहे.
क्लास चालकापासून पालकापर्यंत,
जो तो वाटतो लोफर आहे.
छोट्या माशांबरोबर,
मोठा मासाही आता गळाला आहे.
पुत्र प्रेमासाठी वाटेल ते,
याचा नवा पुरावा मिळाला आहे.
पेपरफुटीमुळे कुठे दुःखाची कळा,
कुठे कुठे भावना सुखाची आहे !
ज्यांची ज्यांची झाकलेली आहे,
त्यांची मूठ किती लाखाची आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9281
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 मे 2026

 

No comments:

लबाडीचे सत्य ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- लबाडीचे सत्य लोक जेवढे मिंधे असतात, तेवढेच लोक स्वार्थी असतात. म्हणूनही कुठल्याही घोटाळ्याचे, अनेक...