Wednesday, May 27, 2026

महागाईचे अर्थशास्त्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
महागाईचे अर्थशास्त्र
टंचाईवरती स्वार होऊन,
महागाई जीव घेऊ लागते.
कोणत्याही टंचाईच्या गर्भातून,
साठेबाजांची पैदास होऊ लागते.
टंचाई आणि साठेबाजांचे,
मोठे व्यवहारिक नाते आहे.
प्रत्येक वेळी वेगळे उत्तर असते,
कोण कुणातून जन्म घेते आहे?
टंचाईतून साठेबाजांचा तर,
साठेबाजीतून टंचाईचा उगम आहे !
महागाईचे अर्थशास्त्र,
कॅश काउंटरवरती सुगम आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9289
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27मे 2026
 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...