Thursday, May 28, 2026

दावे आणि कावे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
दावे आणि कावे
राजकीय मित्रांचे मित्रांसोबत,
सतत राजकीय कावे असतात.
अटीतटीच्या जागेवरती,
सतत सर्वांचेच दावे असतात.
दाव्याच्या आणि काव्याच्या,
राजकारणाला कधीच मर नाही.
त्यामुळेच सर्वांचा दावा असतो,
ज्याला कर नाही त्याला डर नाही.
दाव्या आणि काव्यामुळेच,
राजकीय आदळाआदळ होते !
इच्छापूर्तीनंतर त्यांचा दावा असतो,
आमचे सगळे पेल्यातले वादळ होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9290
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 मे 2026

 

No comments:

दावे आणि कावे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- दावे आणि कावे राजकीय मित्रांचे मित्रांसोबत, सतत राजकीय कावे असतात. अटीतटीच्या जागेवरती, सतत सर्वा...