Saturday, May 23, 2026

फॉर्म्युल्यांचे सूत्र..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
फॉर्म्युल्यांचे सूत्र
पुढच्या असो वा मागच्या दाराची,
निवडणुकीचा फॉर्मुला ठरला जातो.
तडजोडी नंतर जे हाती लागते,
तोच फॉर्मुला गृहीत धरला जातो.
कोणत्याही निवडणुकीत,
राजकीय फॉर्मुले गाभडले जातात.
सगळ्यांचेच राजकीय मनसुबे,
वांझोट्या चर्चेत चिबडले जातात.
नव्या राजकीय फॉर्मुल्याला,
जुन्या फॉर्मुल्याची अजिबात सर नाही!
सत्ता लालसेच्या राजकारणात,
फॉर्मुल्यांनाही अजिबात मर नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9285
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 मे 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...