Monday, May 18, 2026

कुटुंब प्रमुख


आजची वात्रटिका
------------------------

कुटुंब प्रमुख 

पक्ष पक्षाचे राजकारण, 
बघा कोणत्या थराला जाऊ शकते? 
एका पक्षाच्या कुरबुरीची तक्रार, 
दुसऱ्या पक्षप्रमुखाकडे होऊ शकते. 

पक्षीय राजकारणामध्ये, 
जणू एवढेच व्हायचे राहिले होते.
पक्षप्रमुखाकडे पक्षप्रमुख म्हणून नाही, 
तर कुटुंब प्रमुख म्हणून पाहिल होते.

कधी वाटते वाद चालू आहे, 
कधी वाटते वाद शमला आहे !
उद्या तेच आपल्याला सांगू शकतात, 
हा आमचा कौटुंबिक मामला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9280
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
18 मे  2026

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...