आजची वात्रटिका
--------------------------
आजचे वास्तव
छोटे छोटे प्रादेशिक पक्ष,
सत्तेच्याच मागे धावायला लागले.
निवडणुकीचे निकाल सांगतात,
प्रादेशिक पक्ष लोप पावायला लागले.
द्विपक्षीय नाही तर,
एकपक्षीय निवडणूकीकडे पाऊल आहे.
शत प्रतिशत खात्री झाली,
ही लोकशाही संपण्याची चाहूल आहे.
हारलेल्याबरोबर जिंकलेल्याचाही,
निकालावर विश्वास बसायला हवा !
लोकशाहीच्या अस्तित्वासाठी,
विरोधी पक्ष जिवंत असायला हवा !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9267
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 मे 2026

No comments:
Post a Comment