Tuesday, August 31, 2021

ईडीचा इंगा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईडीचा इंगा

याच्यामागे काडी आहे,
त्याच्यामागे काडी आहे.
जी सारख्या काड्या करते,
तिचे नाव ईडी आहे.

ईडीच्या काड्या म्हणजे,
मागे लागलेला भुंगा आहे!
कोणी नादी लागू नये,
असा ईडीचा इंगा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7688
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट 2021

 

प्रगतीचे लक्षण..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रगतीचे लक्षण

मुलांबरोबर मुलींचाही,
शिक्षणातला वाटा वधारतो आहे.
एवढ्यावरूनच कसे समजायचे?
तालिबानी हळूहळू सुधारतो आहे.

तालिबानी सुधारत असले तरी,
त्याची गती मात्र कासवछाप आहे!
त्यांच्या हेही लवकर लक्षात येवो,
निष्पापांची हत्या हेही पाप आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6251
दैनिक पुण्यनगरी
31ऑगस्ट 2021

 

Monday, August 30, 2021

कच्चे बच्चे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कच्चे बच्चे

सच्चे लोक कमी होवून,
लुच्चे खूप वाढले आहेत.
कुणाच्या तरी सौजन्याने,
बगलबच्चे खूप वाढले आहेत.

लूच्चे आहेत,बच्चे आहेत,
तेवढेच ते कच्चे आहेत !
त्यांची उंचीच सांगायची तर,
ते टिचभर टिच्चे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7687
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट 2021

 

जाहीर नोटीस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
जाहीर नोटीस
जो जो कोणी विरोधात जाणार,
त्याचा परिणाम एकच होणार.
आमची खबर पक्की आहे,
त्याला नक्की ईडीची नोटीस येणार.
केंद्र आणि राज्यातला संघर्ष,
हा पूर्णतः सरकारी मामला आहे !
ईडीच्या नोटीशीचे अर्थ लावून,
आमच्यातला अर्थतज्ञ दमला आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6250
दैनिक पुण्यनगरी
30ऑगस्ट 2021

 

Sunday, August 29, 2021

बोला-बोली ते खोला-खोली...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बोला-बोली ते खोला-खोली

ते म्हणाले, प्रकरणं बाहेर काढू,
हे म्हणाले,तर आम्ही संदूक खोलू.
त्यांचे ते बघून घेतील,
इतरांनी त्यात नाक नका घालू

आधी फक्त बोला बोली होती,
नंतर मात्र कोला कोली आहे !
माफीचे साक्षीदार असल्यासारखे,
आता चक्क खोला खोली आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6249
दैनिक पुण्यनगरी
29ऑगस्ट 2021

 

Saturday, August 28, 2021

एका नेत्याची प्रेम कविता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

एका नेत्याची प्रेम कविता

तू विरोधी पक्ष होतेस तेव्हा
तुझा राग मिरचीसारखा असतो.
तू बिलगतेस अंगाला तेव्हा
तुझा स्पर्श खुर्चीसारखा असतो.

मी सामान्य कार्यकर्ता होईल,
तू हायकमांड होशील काय?
सरकार अपक्षांना देते
तेवढे डिमांड देशील काय ?

तुझा माझा संयुक्त जाहीरनामा
मी आघाडी प्रमाणे जपत आहे !
माझ्याशी बंडखोरी करशील तर
तुला लोकशाहीची शपथ आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-1648
दै.पुण्यनगरी
5ऑक्टोबर 2008

 

दोस्ती दुश्मनी..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
दोस्ती दुश्मनी
दुश्मनाचा दोस्त व्हावा,
दोस्ताचा दुश्मन होवू नये.
दोस्ताचा दुश्मन होण्याची वेळ,
दुष्मनावरही येवू नये.
दोस्ताचा दुश्मन झाला की,
त्याचे तोंड जास्तच सुटू लागते!
टॉप असणाऱ्या सिक्रेटलाही,
बेतालपणे वाचा फुटू लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
28ऑगस्ट 2021

 

ओळख-पाळख..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
ओळख-पाळख
ज्यांचे ज्यांचे खात-पित आहेत,
त्यांचे त्यांचेच गुणगाण गाऊ लागले.
पक्षापेक्षा नेत्यांचेच म्हणून,
कार्यकर्ते ओळखले जाऊ लागले.
वाजवा रे वाजवा, फुका रे फुका,
नेत्यांचा कार्यकर्त्यांना दट्टा असतो!
कार्यकर्ता कितीही धट्टाकट्टा असो,
कार्यकर्त्यांच्या गळ्यात पट्टा असतो!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6248
दैनिक पुण्यनगरी
28ऑगस्ट 2021

 

Friday, August 27, 2021

ढिंग टांग ..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ढिंग टांग .....

परक्याकडून नाहीतर,
आपल्याकडूनच आळ होतात.
कुर्‍हाडीचे दांडे असे,
आपल्याच गोतास काळ होतात.

जो तो वर तंगडी करून,
बरोबर टांग हाणत असतो !
आपले चांगले पांग फेडून,
आपल्याला रॉंग म्हणत असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7686
दैनिक झुंजार नेता
27ऑगस्ट 2021

 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...