Friday, August 27, 2021

सभ्यतेचा गुन्हा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सभ्यतेचा गुन्हा

पूर्वी शालजोडीतून मारायचे,
आता जोड्याने मारायची भाषा आहे.
बदलत्या राजकारणाची,
अत्यंत दयनीय अशी दशा आहे.

कुणी नव्याने हिशोब मांडतो आहे,
कुणी जुने हिशोब चुकते करतो आहे!
जणू सभ्यता पाळणे,
हाच राजकीय गुन्हा ठरतो आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6247
दैनिक पुण्यनगरी
27ऑगस्ट 2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...