Monday, August 2, 2021

फालतू लाड

आजची वात्रटिका
---------------------

फालतू लाड

तोडाफोडी, धक्काबुक्की,
कार्यकर्त्यांचा जास्तच लाड आहे.
पक्षाची आणि लोकशाहीचीही,
कार्यकर्त्यांना कुठे चाड आहे?

स्टंटबाजीचाच गाजावाजा होतो,
त्यांनी गाळलेल्या घामाचा नाही !
तरीही कोणत्याही कार्यकर्त्याचा,
फालतू लाड काही कामाचा नाही!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6221
दैनिक पुण्यनगरी
2ऑगस्ट 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...