आजची वात्रटिका
--------------------------
अमृताचे बोल
सुवर्ण महोत्सवात घोषणा होती,
मेरा भारत महान आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवतही,
अजून कोरडीच तहान आहे.
मेरा भारत महान होता,
आजही भारत महान आहे,
आणि उद्याही महान असेल !!
भविष्यात लवकरच,
भागलेली तहान असेल!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6236
दैनिक पुण्यनगरी
15ऑगस्ट 2021

No comments:
Post a Comment