Friday, August 20, 2021

तालिबानीस्तान...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
तालिबानीस्तान
जेवढी अफगाणिस्तानात आहे
तेवढीच सगळीकडे घाण आहे.
लिहायला बोलायला भीती वाटते,
सगळीकडेच तालिबान आहे.
वेगळा रंग आहे,वेगळा ढंग आहे;
त्यांच्या करणीत कुठे फरक आहे?
तालिबान ही प्रवृत्ती असून,
करणी आणि कथनी पूरक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7680
दैनिक झुंजार नेता
20ऑगस्ट 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...