Thursday, August 12, 2021

गुंडोबा ....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

गुंडोबा

जसे बंडोबा असतात,
तसे गुंडोबाही असतात.
पक्षाचे झेंडे मिरवायला,
काही झेंडोबाही असतात.

ज्यांना खेळ खंडोबा जमतो,
त्यांची वेगळीच शान आहे!
बंडोबा आणि झेंडोबापेक्षा,
गुंडोबांना जास्त मान आहे!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6233
दैनिक पुण्यनगरी
12ऑगस्ट 2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...