Tuesday, August 24, 2021

उद्योग-मंत्री...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उद्योग-मंत्री

लघु आणि मध्यम उद्योग सोडून,
केंद्रीय मंत्री मोठे उद्योग करू लागले.
एकानंतर एक असे,
वक्तव्य वादग्रस्त ठरू लागले.

गेला उडत आणि पांढर्‍या पायानंतर,
कानशिलात लगावण्याची भाषा आहे!
जीभ पुन्हा पुन्हा घसरू नये,
आपली एवढीच वेडी आशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7683
दैनिक झुंजार नेता
24ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...