Thursday, August 12, 2021

संसदेचा आखाडा...आजची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

संसदेचा आखाडा

संसद आणि लोकशाहीची,
लोकप्रतिनिधींना आब नाही.
संसदेचा आखाडा होणे,
ही काही नवीन बाब नाही.

याचि देही, याचि डोळा,
देशाला तमाशाचे दर्शन आहे!
संयम आणि सामंजस्याचे,
संसदेमध्ये अवर्षण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7673
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट 2021

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...