Tuesday, August 17, 2021

कसोटीचे फंडे....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कसोटीचे फंडे

कसोटीला ट्वेंटी-ट्वेंटीचा,
गुण आणि वाण आहे.
क्रिकेटला चकाकी मिळाली,
हे तर नक्कीच छान आहे.

कसोटीला वाटलेही नसेल,
आयुष्यात असा 'वन डे' येईल!
आपला रटाळपणा जाऊन,
प्रत्येक दिवस फन डे होईल !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6237
दैनिक पुण्यनगरी
17ऑगस्ट 2021

 

2 comments:

विनोद खरे said...

छान, समर्पक.....👌

Krushna A. Ankush said...

चालू भारत इंग्लंड कसोटीला समर्पक

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...