Thursday, August 19, 2021

यात्रा फल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

यात्रा फल

यांच्या झाल्या की त्यांच्या,
यात्रावर यात्रा असतात.
सांगायला यात्रा असल्यास तरी,
त्या राजकीय जत्रा असतात.

यात्रा येतात, यात्रा जातात;
पाठीशी यात्रेचे पुण्य असते!
जनतेसाठी 'यात्राफल' काय तर?
हाती भोपळा म्हणजे शून्य असते!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6239
दैनिक पुण्यनगरी
19ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...