Wednesday, August 11, 2021

ढिलाई.....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ढिलाई

जे जे काही बंद होते,
ते ते आता खुले झाले.
कोरोनाचे कडाक नियम,
हळूहळू ढिले झाले.

थोडी ढील दिली म्हणून,
आपल्याकडून ढिलाई नको !
हातभर फाटल्यावर,
नंतर मात्र हातशिलाई नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7672
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट 2021

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...